मुंबई (संकलन-सुरेंद्र शिंदे) :
प्रति,
क्षत्रियकुलवतंस छत्रपति शिवाजी महाराज
राजे आपणांस मानाचा मुजरा,
विषय : मराठ्यांच्या सध्य् स्थिती संदर्भात
प्रिय राजे,
मी एक सामान्य मराठा तरुण, आपल्याच महाराष्ट्र प्रांतातून आपणास मराठा समाजाच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती देण्यासाठी हे पत्र लिहित आहे.
राजे, आपण आज हवे होतात.. राजे आज आपली अत्यंत गरज आहे..अस्स आम्ही उरलेल्या मराठ्यांनी कितीही म्हटलं तरी तुमचं पुन्हा येणं किंवा होणं अवघड आहे हे आम्ही जाणतो. तरी देखील आम्हाला तुम्हाला पाहण्याची एक वेडी आशा आहे.
महाराज, तुमच्या पश्चात शिवशाही गेली.. लोकशाही आली..पण ही लोकशाही तुम्ही पाटीलकी - देशमुखी दिलेल्या काही मुठभर मराठ्यांनीच बळकावली. शाहु राजेंनी सुरु केलेलं शिक्षण आणि नोकरी मधलं आरक्षण कधी बंद झालं समजलं ही नाही. त्यामुळे आज आपल्या मराठा तरुणांची फार आबाळ होते आहे राजे....
काहींच्या बड़ेजावामुळे आम्हाला खडतर प्रवास करावा लागतोय..तरीही आपला मराठा तरुण आपल्या लढाऊ वृत्तीने परिस्थितीचा सामना करीत आहे. त्याची तलवार आता तुटत आलीय राजे...
हे प्रजापति, आपना कडून आम्हाला कायमच एक उमेद..एक स्फूर्ति..एक जिद्द मिळत असते..म्हणून तर पाटीलकी - देशमुखी रंगवलेल्या मराठ्यांनी आमदार खासदार होऊन आपली भरलेली घरं अजुन भरली तरी आम्ही आमच्या कष्टातुन आमच्या परीने जीवनाचा मार्ग काढीत आहोत.
हे स्फूर्तिदाता, आज आमच्या मराठा तरुणाला शिक्षण आणि नोकरीसाठी प्रचंड खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.व्यवसायासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे .
आपले मुंबईसारख्या शहरात राहणारे मराठे अजुनही टीकण्यासाठी झगडतायत. बिल्डिंग मधे घर घेण्याचा प्रयत्न करतायत.
राजे, आम्ही अजूनही शिवजयंती निमित्त हळदीकुंकू, खावूवाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर असे ठरलेले कार्यक्रम करतोय. मराठा तरुणांच्या शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि शेती विषयात आम्ही आजवर तेव्हडा रस घेतला नव्हता पण आता सुरुवात तर नक्कीच झालीय.
हे राजाधिराज, आपला मराठा तरुण व्यसनाधीन झालाय. त्याला राजकारणाचा कर्करोग झालाय. त्यांना उच्चशिक्षण घ्यायला लावून स्वावलंबी होण्याची गोळी देण्याचा प्रयत्न चालू आहे.
जेणे करुन बेरोजगारीमुळे त्याला राजकारण्यांचं गुलाम बनन्याची वेळ येवू नये.
बाकी सर्व ठिकच म्हणाव लागेल. पण आपण मराठा तरुणांसाठी जे काही करण्याचा प्रयत्न करतोय त्या कामात खुप मोठ्या प्रमाणावर शिकलेल्या, अराजकीय आणि निस्वार्थी मराठा तरुणांची गरज लागेल. तुमच्या वेळसारखे तानाजी मालुसरे, जीवा महाला कुठून आणू ?
असो, तुम्ही जेव्हड़ काही आमच्यासाठी केलं त्याबद्दल आम्ही कायमच ऋणी आहोत. कायम राहू.
मला आणि आपल्या सर्व मराठा तरुणांना तुम्ही कायमच प्रेरणा देत राहील.
- एक निष्ठावंत मावळा
0 टिप्पण्या