विहीर जोड़ प्रकल्प

अरुण गवळी (कृषी उन्नती) :-सातारा जिल्ह्यात विहीर जोड प्रकल्पाचा अनोखा प्रयोग.

सामुहिक प्रयत्नातून दुष्काळावर मात करता येऊ शकते,हे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावच्या शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. नदी जोड प्रकल्पाची चर्चा नेहमीच होत असते,मात्र त्यातून प्रेरणा घेऊन जोतीराम पवार यांना ही नामी आयडिया सुचली. गावच्या शिवारातील विहिरी पाईप लाईनने एकमेकांना जोडल्या तर त्याची वाटर बँक होऊ शकते. असे मनात आले आणि ते सत्यात उतरले ,आज १५० एकर कोरडवाहू शेती पाण्याखाली आली आहे. गरज आहे ती समंजस पणाची. अवघे दहावी पर्यंत शिक्षण झालेले जोतीराम भाऊ चाळीशीतील आहेत. सातारा येथील दाताचे डॉक्टर अविनाश पोळ यांनी त्यांना याकामी मदत केली. २०१० पासून त्यांना शेतकऱ्यांना ही आयडिया पटविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीस ही नवी आयडिया पटण्यास उशीर लागला,अनेक बैठका,चर्चा झाल्या जोतीराम भाऊंनी प्रथम आपली विहीर देऊ केली,हळू हळू बाकी शेतकरीही तयार झाले. या प्रकल्पाला सुमारे सात लाख रुपये खर्च आला,११००० हजार फुट पाईप लाईन टाकावी लागली यासाठीचा खर्च सरकारच्या मदती विना शेतकऱ्यांनीच केला. अतिशय अल्प दरात आता हे पाणी सर्वांना मिळते. आता भूजल पातळी वाढविण्यासाठी छोटे छोटे बंधारे बांधणे सुरु आहे. योजना यशस्वी होते आहे हे पाहून बाकी शेतकरीही सहभागी होत आहेत. आता शेजारी गावातील शेतकरीही हा प्रयोग करण्यास सरसावले आहेत. (सौजन्य :www.supanth.com)
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या