सांगली : कॉ दता देशमुख पुरोगामी विचारमंच च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार यावर्षी पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते व लेखक अँड के डी शिंदे (सांगली) यांना जाहिर झाला आहे. डॉ बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली एम् एन जाधव व इतर ट्रस्टीज यांच्या पुरस्कार निवड समितीने पुणे येथे हा पुरस्कार जाहिर केला. मानपत्र व रक्कम रूपये 51,000/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अँड के डी शिंदे गेली 33 वर्षे कामगार व औद्योगिक न्यायालयात वकिलि करतात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, कामगार चळवळ यामध्ये ते गेली 40 वर्षे सक्रियपणे कार्यरत आहेत. सत्यशोधक वाचनालय, जनरल मजदूर यूनियन, युगप्रवर्तक प्रतिष्ठाण यांची त्यानी स्थापना केली आहे. हिंद मजदूर सभा, हमाल पंचायत, एस टी कामगार संघटना यांच्यासोबत ते 1980 पासून काम करत आहेत. त्यानी आजपर्यन्त विविधअंगी लेखन केले आहे. सत्यकथा, मोबाइल स्वस्त भाकरी महाग, कर्मवीर भाऊराव पाटील, कॉ गोविंद पानसरे यांचा खून का झाला?, संघर्ष शेतकरी पेन्शनचा या पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.
हां पुरस्कार यापूर्वी मृणाल गोरे, अण्णा हजारे, संतराम पाटिल, डॉ एन डी पाटिल, कॉ गोविंद पानसरे, भाई वैद्य यांना दिला गेला होता. यावर्षी अँड के डी शिंदे यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे
0 टिप्पण्या