भारत देशात कांदा उत्पादन हे सर्वात जास्त महाराष्ट्रात होते. या कांदा पिका मुळे नाशिक विभागात सुबत्ता येत होती. कांदा जरी मराठी शेतकरी पिकवत असला तरी त्याचा दर दिल्ली तील व्यापारी ठरवत असत. पण नफ्यातील टक्का कमी होता म्हणून मग व्यापारी मंडळी एक होऊन त्यांनी मोदी शहा ला हजारो कोटींची पक्ष निधी देऊन त्यावर उपाय योजना करण्यासाठी सांगितले. याची अंमलबजावणी करण्यासाठी लालसगाव येथील कांदा संशोधन संस्था दिल्ली ला हलवली. दिल्लीत काय कांदे उपडणार हे प्रशासकीय अधिकारी व नैतिकता विकून खाणाऱ्या राजकीय नेते व पक्षांना माहीत.
ही टोळ धाड फक्त एका भाजपा पक्षांची नसून यामध्ये सर्वजण सामील आहेत.
ज्यांनी हा घोटाळा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला त्यांचा अचानक हार्ट अटॅक ने आणि अपघातात मृत्यू झाला. काहींची बदली महाराष्ट्र राज्यातून थेट कोलकता.... चेन्नई... हरियानात झाली. सर्व त्या प्रसिद्धी माध्यमांना वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद भेटला आहे.
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दगडावर डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना किंमत द्यायला वेळ कुणाकडे आहे. भरीसभर स्थानिक नेते मंडळींनी कधी नव्हे तो कमालीचा प्रामाणिक पणा दाखवून आपली शेतकरी विरोधी निष्ठा "सोन्याची कोंबडी कापून खाऊन" दाखवली.
तेंव्हा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बोंबलून स्वतःचा हात आणि तोंड सुजवून घेऊ नये. तरीही तुम्ही बोंबलायला लागलात तर तुम्ही नक्षलवादी म्हणून सर्वपक्षीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कृपेने गुन्हे दाखल करू आणि तुमच्या नावावर असलेल्या जमिनी सरकार जमा करून घेऊ.
प्रसार माध्यमांना त्यांचे त्यांचे जाहिरातीचे पॅकेज्जेस मिळाली आहेत. कांदा उत्पादक शेतकरी पुत्र विकत घेतलेल्या पण फुकटच्या नावाखाली मिळणाऱ्या2 जीबी इंटरनेट मध्ये मश्गुल आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लाचारी, भीती, असंघटित पणा, गुलामी वृत्तीच त्यांच्या नाशाला कारणीभूत आहे. तुमची पोरं मंदिर बनवण्यात आपली उमेदीच्या काळा ची राख रांगोळी करत आहेत आणि मुली...त्या काय मुलीच दुर्बल स्त्रीच ना !! ती. त्या निक सारखा नवरा मिळवण्यासाठी नट्टापट्टा करन्यात व्यस्त.
उठा पेटून उठा.... स्वत्व जागे करा !!
न्याय हक्काची लढाई लढा...
असेल पौरुषत्व शाबीत तर ...!!
0 टिप्पण्या