नागरिकत्व दुरूस्ती कायदयाला कोल्हापूर अभासेचा जाहीर पाठिंबा – सचिन पाटील


नागरिकत्व दुरूस्ती कायदयाला कोल्हापूर अभासेचा जाहीर पाठिंबा सचिन पाटील

कोल्हापूर : अखिल भारतीय सेना पक्ष कोल्हापूर जिल्ह्याच्यावतीने केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला जाहीर पाठिंबा आम्ही आज देत आहोत असे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी टाऊन हॉल जवळील स्भामंडपात झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाष्य केले.
राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद जयंती आणि पक्षाचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकर्ता मार्गदर्शन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना जीवन व समाजकार्य याबाबत अंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध पत्रकार अमरसिंह राजे यांनी मार्गदर्शन केले. प्रा.डॉ.दत्तात्रय जाधव सरांनी जिजाऊ मांसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा जागर केला. अरुण गवळी यांच्या फोटोचा वापर करून सोशल मीडियावर पक्षाबाबत चुकीच्या पोस्ट करून पक्षाची व जनतेची फसवणूक करणार्‍याच्या विरोधात पोलिस तक्रार करण्यासाठी पोलिसांना निवेदनही यावेळी दिले.

या कार्यक्रमाला शिवाजी जवंदाळ, अनंत जाधव, दिपक खेबुडे, सुधीर खेबुडे, अक्षय भांबुरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील रोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू पोरलेकर यांनी केले.

      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या