जैवउर्जा शेतीतील (Biodynamic Farming) एक घटक

सांगली (अरुण गवळी) बीडी-५०१ (सिलिका) तयार करण्याची पद्धत व
उपयोग
शेतकरी मित्र हो, हनुमान जयंती आता जवळ आलेली आहे.
जैव उर्जा शेती म्हणजेच बायोडायनॅमीक शेती अंतर्गत
या वेळी बीडी-५०१ किंवा ज्याला आपण
सिलीका म्हणतो तो तयार करण्यासाठी योग्य दिवस.
सेंद्रिय शेतीचा जागर अखंड भारतात चालु
झालेला असतांना त्यातील काही घटक
आपल्या उपयोगी पडावेत म्हणून मी ते
या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. या घटकांपैकीच
एक म्हणजे बायोडायनॅमीक पद्धतीने तयार केलेले पिक
संरक्षक कवच ज्याला आपण बीडी-५०१
किंवा सिलीका असे म्हणतो.
मुळात बीडी-५०१ किंवा सिलीका म्हणजे काय ते आपण
पाहूत. यामध्ये
शिरगोळा किंवा स्फटीकासारखा निघनारा चुनखडीच्या जमिनीतील
एक दगड ज्यापासून रांगोळी तयार केली जाते याचा वापर
केला जातो. या दगडाला चांगले बारीक करून घेवून
त्याची पुड वस्त्रगाळ करून घ्यावी. ही वस्त्रगाळ
केलेली पुड घेतल्यानंतर गायीचे शिंग घ्यावे. ते
स्वच्छा असावे. गायीचे शिंग कसे ओळखावे
याच्या काही खुणा म्हणजे या शिंगावर
रिंगा पडलेल्या पहावयास मिळतात.
व्यापारी या रिंगच्या आधारेच गाय कीती वेताची आहे हे
ओळखतात. इतर जनावरांच्या शिंगावर अशा रिंग पहावयास
मिळत नाहीत. शिंगाला कोणताही रंग नसावा. रंग
लावलेला असल्यास तो घासून काढून टाकावा. अशा स्वच्छ
केलेल्या शिंगामध्ये ही रांगोळीची पुड पिठासारखी तिंबून
त्यामध्ये भरावी. ती स्थिर होईपर्यंत थांबावे.
मोकळ्या जागेत दीड बाय दीड फूट
आकाराचा खड्डा खोदावा. यामध्ये
निघालेली माती एका बाजूला टाकावी. या खड्ड्यामध्ये
सुरूवातीला चांगले कुजलेले शेणखत एक टोपले टाकावे.
त्यानंतर हे रांगोळी भरलेले शिंग गायीच्या डोक्यावर
ज्या पद्धतीने असते त्याच पद्धतीने खड्यात ठेवावे.
म्हणजेच तोंड असलेला भाग हा खाली व शिंगाचे टोक वर
या प्रमाणे मांडावे. खड्ड्याजवळ झाडे नसावीत. शिंग
खड़्ड्यात मांडल्यानंतर हा खड्डा वरच्या मातीने संपूर्ण
भरून घ्यावा. यामुळे शिंग जमिनीत संपूर्ण गाडले जाईल.
शिंग पुरल्यानंतर त्या ठिकाणी ओळखणीसाठी एखादे
दगडाला रंग लावून ठेवावे. हे शिंग या ठिकाणी सहा महिने
राहणारे असल्यामुळे लक्ष देणे गरजेचे आहे.
हनुमान जयंतीला पुरलेले शिंग आपण
कोजागीरी पोर्णिमेला बाहेर काढावे. शिंगामध्ये तयार
झालेल्या सिलीकांचा रंग तपकिरी रंगाचा झालेला पहावयास
मिळेल. निघालेले बीडी-५०१ (सिलीका)
काचेच्या किंवा प्लॅस्टिक बरणीमध्ये ठेवावे.
ही बरणी उन्हात किंवा प्रकाशात राहील
याची दक्षता घ्यावी. एका शिंगापासून २५ एकरला पुरेल
एवढे बीडी-५०१ तयार होते. याचा उपयोग सर्व
पिकांमध्ये संरक्षक कवच म्हणून होतो. पिक
कितीही अडचणीत असले तरीही त्याला बाहेर काढण्याचे
कार्य हे करते. पीक दोन पानांवर असतांना व त्यानंतर दर
२१ दिवसांचे अंतराने याची फवारणी करावी. याचे
फवारणीमुळे पिकामध्ये रोग व कीड
प्रतीकारशक्ती निर्माण होते. हवामानातील बदलासाठीतर हे
सर्वोत्तम आहे. याला कोणत्याही पिकावर वापरता येते.
यामध्ये फळझाडे, फुलझाडे, सर्वसाधारण पीके यामध्ये
यांचा वापर केल्यास त्याचे निश्चितच उत्तम परिणाम
आपणास पहावयास मिळतात. करपा, फुलकीडी, तुडतुडे,
करपा या कीड रोगांपासून संरक्षणा बरोबरच पिकाची अन्न
घेण्याची क्षमता वाढवण्याचे कार्य हे करते.
आतापर्यंत लिहिलेले आपण वाचले त्याबद्दल आपले आभार.
रासायनिक युगामध्ये आपलीही मानसीकता बदलत
चाललेली आहे. त्यात असे कीतीतरी लेख आपल्या वाचनात
येत असतील. परंतु किती लेखांना आपण न्याय देतो हे
पाहण्यासारखे आहे. हे वाचुन आपणास काही वेगळे वाटू देवू
नका कारण आता आपण या सिलीकांचा उपयोग
कसा करावयाचा हे पाहणार आहोत.
सिलीका किंवा बीडी-५०१ हे बायोडायनॅमीक शेतीतील एक
प्रमुख अस्त्र आहे. याचा उपयोग फारच काळजीपूर्वक
करावा लागतो. चुकीच्या पद्धतीने वापर झाल्यास संपूर्ण
पीक जळू जाण्याची शक्यता असते. यामुळेच मी आपण
लेख योग्य पद्धतीने वाचत आहात की नाही हे पहात होतो.
बीडी-५०१ एक ग्रॅम मोजून घ्यावे. प्लॅस्टिक बकेटमध्ये
१३ लिटर पाणी घ्यावे. यामध्ये या एक ग्रॅम
सिलीका किंवा बीडी-५०१ टाकावे. या मिश्रणास एक तास
सारखा भोवरा होईल या पद्धतीने घड्याळाच्या दिशेने व
विरूद्ध दिशेने सारखे ढवळत रहावे. हे अत्यंत महत्त्वाचे
आहे. हे काम दिवस उगवण्यापूर्वी करणे गरजेचे आहे.
दिवस उगवण्यापूर्वी किंवा उगवत असतांना तयार केलेले
द्रावण एक एकर क्षेत्रावर हवेत फवारावे. पीक दोन
पानांवर असतांना याची पहिली फवारणी द्यावी. त्यानंतर
दर २१ दिवसांचे अंतराने फवारले तरी चालते. धुई किंवा धुके
आल्यानंतर सर्वच पिकांमध्ये रोग कीडींचा प्रादुर्भाव
झालेला पहावयास मिळतो. धुई दिसताच आपण
याची फवारणी केली तर आपल्या फवारलेल्या क्षेत्रामध्ये
आपणास धुई प्रत्यक्ष बाजूला गेल्याचे पहावयास मिळेल.
याचा उपयोग करून कांदा, मिरची, टोमॅटो,
भेंडी या सारख्या पिकांमध्ये दिसणा-या सर्व
प्रकारच्या कीडी अत्यंत कमी झाल्याचे तीन दिवसांतच
पहावयास मिळेल. मग करायचेना बीडी-५०१
घरच्याघरी तयार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या