ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला

कोल्हापूर : - ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला आहे. हल्ल्यात पानसरे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोल्हापुरातील सागरमळा भागातील त्यांच्या राहत्या घराजवळ हल्ला झालेला आहे. ते सकाळी घराबाहेर पडले असताना दोन अज्ञात व्यक्तींनी गाडीवरून येऊन त्यांच्यावर
गोळीबार केला. गोळी लागल्याने पानसरे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.

कोल्हापुरातील अँस्टर आधार रूग्णालयात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरही पुण्यात असाच हल्ला झाला होता. त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट असताना आता पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात पुन्हा अशीच लाजिरवाणी घटना घडली आहे.
गोविंद पानसरेंचे कोणीही वैयक्तिक शत्रू नाहीत - एन डी पाटील

- पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही घटना चिंताजनक, विचारांची मांडणी करणाऱ्यांना विचाराने प्रत्युत्तर देता येत नाही का?- शरद पवार

- कॉम्रेड पानसरे यांचे हल्लेखोर तातडीने पकडणं गरजेचं आहे - मुक्त दाभोलकर

- दाभोलकर आणि पानसरे यांचे हल्लेखोर एकच आहेत का? याचा शोध घ्यावा. हा विचार करुन रचलेला कट - मेधा पाटकर

- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध - खासदार राजू शेट्टी

- हल्लेखोरांना पकडण्यासाठी कोल्हापुरासह राज्यभरात नाकाबंदी - गृहराज्यमंत्री राम शिंदे

- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला दुर्दैवी - सहकार मंत्री चंद्रकांत पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या